मुंबईतील आद्य शक्तिपीठे

Front Cover

शक्तीची उपासना भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मोहें – जो – दडोच्या उत्खननात प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले आहेत. त्यात देवीच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यावरून सर्वसाधारणपणे इ. स. पूर्व चार हजार वर्षे शक्तीची उपासना येथे होती असे म्हणता येते.

वेदवाङ्मयातही ‘उषादेवी’, ‘सुर्यादेवी’, ‘लक्ष्मीदेवी’ अशा विविध देवतांची अनेक सूत्रे आढळून येतात. ॠग्वेदाच्या आठव्या मंडलातील शेवटच्या सूक्तात सरस्वतीची स्तुती आहे. यजुर्वेदात तर सरस्वतीला आहुती देण्यात आलेली आहे. अथर्वशीर्ष, देवी सूक्त व श्रीसूक्त यात तर देवीचेच स्तवन आहे. अथर्ववेदातील सौभाग्यकाण्डात तंत्राचे विवेचन आलेले आहे. उपनिषदात अनेक ठिकाणी सृष्टी निर्मितीचे रहस्य सांगताना प्रकृती आणि पुरुष यांच्या वर्णनातून या शक्तीचेच रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

महाभारतातील ‘दुर्गादेवी’चे महात्म्य वर्णन आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेता भारतात शक्तीची उपासना फार प्राचीन काळापासून चालत असावी यात संदेह राहत नाही. पंचमहाभूतांच्या उपासनेमागे हेच शक्तीतत्व प्रधान आहे. इंद्र, वरुण, सूर्य इत्यादी शक्ती जीवन विकास घडवून आणणाऱ्या आणि म्हणूनच उपास्य मानण्यात जीवनावरील महान निष्ठा दिसून येते. परंतु त्याच बरोबर श्रद्धेचे व भावनांचे दर्शन घडून येते.

शक्ति पंथात ज्या अनेक देवतांची उपासना होत असते त्या सर्व देवता ‘सत्व, रज, तम’ या त्रिगुणात्मक शक्तीच्याच प्रतिक आहेत. एकाच देवतेची अनेक नावेही प्रचलित आहेत. तथापि ‘महाकाली’, ’महालक्ष्मी’, ‘महासरस्वती’ या तीन महान् शक्तीचीच ती विविध रूपे आहेत. तसेच तांत्रिकाच्या उपासनेत ‘त्रिपूर सुंदरी’ या देवतेचे प्राधान्य दिसून येते. त्रिगुणात्मक अशा शक्तीचीच ती रूपे असल्यामुळे या शक्तींना ‘आद्यशक्ति’ म्हटले जाते.....

.....

माझे ज्येष्ठ स्नेही श्री. शामराव करंगुटकर व त्यांचे चिरंजीव श्री. नागेश करंगुटकर यांनी आपल्या प्रॉस्पेक्ट प्रिंटींग प्रेसमध्ये हा ग्रंथ तत्परतेने सुबकपणे छापून दिला. पुस्तकातील छायाचित्रे माझा पुतण्या श्री. अनंत विनायक कांबळी उर्फ पिंटु यानी अविश्रांत भटकंती करून काढून दिली. सुप्रसिध्द चित्रकार चंद्रकांत वाईरकर यांचे चिरंजीव श्री. संदीप वाईरकर यांनी तत्परतेने सुंदर मुखपृष्ठ तयार करून दिले. मुंबई मराठी प्रत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वसंतराव शिंदे यांनी तत्परतेने प्रस्तावना लिहून दिली.  सर्वांचे मन:पूर्वक आभार.

विजया दशमी
डॉ. भालचंद्र आकलेकर [२१-१०-९६]

 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Selected pages

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 13
Section 14
Section 15
Section 16
Section 17
Section 18
Section 19
Section 20

Section 9
Section 10
Section 11
Section 12
Section 21
Section 22
Section 23
Section 24

Common terms and phrases

अनेक अश◌ा अश◌ी असते असलेल्या असल्याचे असा असून असे आज आजही आता आपल्या आला आली आले आहे आहेत आिण इतर उत्सव उल्लेख एक एका कथा करण्यात करतात करीत करून काही की केला केली केले कोळी गावदेवी ग्रामदेवता जागृत जातात जाते जातो झाला झाली झाले ठाणे तर तरी ती तीन ते तेथे तेव्हा तो त्या त्यांनी त्याच्या त्यात त्याने त्यामुळे त्यावेळी दर्शन देऊळ देवता देवळात देवी देवीचे देवीच्या देवीला दोन नवरात्र नवस नवसास नारळ नाव नाही पण पावते पुढे पुरातन पूजा पूर्वी प्राचीन प्रिसध्द फूट बांधले बाजूला भाग भागात मंिदर मंिदर आहे मंिदराची मंिदराच्या मंिदरात महाराष्ट्र महालक्ष्मी माहीम मुंबई मुंबईतील मूर्ती मूर्ती आहे मूळ मोठ्या म्हणजे म्हणून या या देवीचे यांच्या यांनी याच येतात येते येथील येथे रुपये लोक वर्षे वांद्रे वेळी व्यवस्था श◌्री सती सध्या सर्व साली सुरु स्थान स्थापना स्वयंभू हा ही हे हे मंिदर होऊन होत होता होती होते होतो ह्या िठकाणी ितच्या ितला िदला िदवश◌ी िदवस

About the author (2017)

 प्रा. डॉ. भालचंद्र पुंडलिक आकलेकर
एम्. ए. एम् कॉम. पी. एच. डी. डी. लीट्. 
जन्म १५-२-१९३५ महाशिवरात्र,

मुंबई येथे शिक्षण – मुंबई वेंगुर्ले, पुणे ऑक्सफर्ड, एम्. एम्. (संस्कृत सुवर्णपदक), इतिहास, इंग्रजी तत्वज्ञान, अर्थशास्त्र, हिन्दी या पाच विषयात एम्. ए. (ऑनर्स) पदवी, अगस्ती संप्रदायावर डॉ. पं. वा. काणे यांच्या मार्गदर्शनावर प्रबंध लिहून संस्कृतमध्ये पी. एच. डी., डी. लिट्. साहित्य रत्न, साहित्याचार्य व इतर ४० पदकांचे मानकरी. अनेक विद्यापीठातून तत्वज्ञान व संस्कृतचे पि. एच. डी. चे मार्गदर्शक.

१९४९ पासून लेखन सुरु. १९६० ते ९२ पर्यंत संस्कृत व तत्वज्ञान प्राध्यापक, दै. चित्रा, प्रजामित्र व नवशक्ती उपसंपादक, १९६२ पासून नवाकाळ, संध्याकाळमध्ये सहसंपादक. कोकणातील दैवतावर व संतावर सतत ४० वर्षे ४० हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध, संपूर्ण कोकणाची पायपीट करून प्रत्येक मंदिराचा व संताच परिचय करून दिला.

आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद शिकागो येथे भूषविले फिलॉसॉफी मासिकाचे ५ वर्षे संपादन.

‘पिशाश्चांच्या परिसरात’, ‘भुताच्या १०१ कथा’, ‘रवळनाथ कल्ट इन इंडिया’ ‘कोकण में जैन धर्म का उद्धाम’ ‘अगस्ती संप्रदाय’, ‘कोकणातील शिव संप्रदाय’, ‘हिस्टरी ऑफ भंडारी कम्युनिटी’ इत्यादी ग्रंथांचे लेखन. सध्या मुंबईच्या सांस्कृतिक परंपरेवर लेखन.

१९९४ पासून मुंबई चौफेर व आपला वर्ताहरचे संपादन, १९७५ पासून भंडारी समाजाचे मुखपृष्ठ हेटकरी मासिकाचे संपादक, इतिहास संशोधन पत्रिकेचे ५ वर्षे संपादनमुंबई मराठी पत्रकार संघ, साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा व इतर अनेक भंडारी मंडळांचे अध्यक्ष व विश्वस्त.

Bibliographic information