भंडारी समाजाचा इतिहास

Front Cover
BRONATO.COM, Apr 15, 2017
0 Reviews
Reviews aren't verified, but Google checks for and removes fake content when it's identified
आजच्या तरुण भंडारी युवकांना भंडारी समाजाची काहीच माहिती नाही. आजच्या युगात जातीच्या भिंती मोडत आहेत त्यामुळे तरुणांना आपल्या समाजाची उज्वल परंपरा माहित असणे अत्यावश्यक आहे अनेक भंडारी मंडळांच्या कार्यकारिणी सदस्यांनाही भंडारी लोक कोण कोठून आले, त्यांची शौर्यगाथा माहित नाही. म्हणून भंडारी समाजाचा संक्षिप्त इतिहास लिहिण्याचे ठरवले. दरम्यान इतिहास संशोधन मंडळासाठी ‘कोकणाचा सांस्कृतिक इतिहास’ लिहित असताना भंडारी समाजाची माहिती गोळा करावी लागली. त्यावेळी लेखन करीत असताना या पुस्तकाची कल्पना सुचली. यापूर्वी माझा ‘हिस्टरी ऑफ भंडारी कम्युनिटी’ हा त्रिखंडात्मक ग्रंथ शिकागो येथे प्रकाशित झाला आहे. आज या मराठी ग्रंथात प्रारंभापासून १९५० पर्यंतचा इतिहास दिला आहे. १९५० ते १९९९ ही वर्षे भंडाऱ्यांच्या इतिहासात महत्वाची आहे. अनेक नामवंत, त्रिखंड कीर्तीची माणसे या काळात होऊन गेली. त्यांचा परिचय पुढच्या भागात देण्याचे ठरवले आहे.

या काळात अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांची सविस्तर माहिती पुढील भागात देण्याचे ठरविले आहे. भंडारी समाजाचा एक हजार पानाचा सविस्तर इतिहास लिहिण्याचा संकल्प आहे. हा ग्रंथ लिहिताना अनेक मान्यवरांचे सहाय्य लाभले त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार!

- डॉ. भालचंद्र आकलेकर
 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Contents

Section 5
Section 6
Section 7
Section 8

Common terms and phrases

१९१२ १९१९ १९३३ १९४९ १९५० अनेक अश◌ा अश◌ी असत असा असून असे आकलेकर आज आपले आपल्या आले आहे आहेत आिण इंग्रजी इतर इितहास उल्लेख एक एका ऑफ करीत करून कर्नाटक कांबळी काम कार्य काही की कीर केला केली केले कै कोकण कोकणात गेले गोवा ग्रंथ घेऊन च्या जात झाला झाली झाले झालेल्या ठाणे डॉ तर तरी तसेच ती ते तेथे तो त्या त्यांचे त्यांच्या त्यांनी त्यात त्यावेळी दादर देऊन दोन धंदा नंतर नाईक नाव नावाचा नावे नाही नोकरी पण पिहले पुढे पृष्ठ प्राचीन प्रिसध्द फार भंडारी भंडारी समाज भाग भाटकर भारत मंडळ मंडळी मध्ये मराठा मराठी महाराष्ट्र मायनाक मालवण मािहती मुंबई म्हणजे म्हणून या यांचा जन्म यांची यांचे यांच्या यांना यांनी यावरून येते येथील येथे रत्नािगरी राऊत रोजी लोक वगैरे वर्षे वी वेंगुर्ले श◌्री शि◌क्षण संस्कृती संस्था सन समाजातील सरदार सर्व सारंग साली सुरु सुर्वे स्थापना हा ही हे हेटकरी होऊन होत होता होती होते ह्या िकंवा िकत्ते भंडारी

About the author (2017)

प्रा. डॉ. भालचंद्र पुंडलिक आकलेकर
एम्. ए. एम् कॉम. पी. एच. डी. डी. लीट्.
जन्म १५-२-१९३५ महाशिवरात्र,

मुंबई येथे शिक्षण – मुंबई वेंगुर्ले, पुणे ऑक्सफर्ड, एम्. एम्. (संस्कृत सुवर्णपदक), इतिहास, इंग्रजी तत्वज्ञान, अर्थशास्त्र, हिन्दी या पाच विषयात एम्. ए. (ऑनर्स) पदवी, अगस्ती संप्रदायावर डॉ. पं. वा. काणे यांच्या मार्गदर्शनावर प्रबंध लिहून संस्कृतमध्ये पी. एच. डी., डी. लिट्. साहित्य रत्न, साहित्याचार्य व इतर ४० पदकांचे मानकरी. अनेक विद्यापीठातून तत्वज्ञान व संस्कृतचे पि. एच. डी. चे मार्गदर्शक.

१९४९ पासून लेखन सुरु. १९६० ते ९२ पर्यंत संस्कृत व तत्वज्ञान प्राध्यापक, दै. चित्रा, प्रजामित्र व नवशक्ती उपसंपादक, १९६२ पासून नवाकाळ, संध्याकाळमध्ये सहसंपादक. कोकणातील दैवतावर व संतावर सतत ४० वर्षे ४० हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध, संपूर्ण कोकणाची पायपीट करून प्रत्येक मंदिराचा व संताच परिचय करून दिला.

आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद शिकागो येथे भूषविले फिलॉसॉफी मासिकाचे ५ वर्षे संपादन.

‘पिशाश्चांच्या परिसरात’, ‘भुताच्या १०१ कथा’, ‘रवळनाथ कल्ट इन इंडिया’ ‘कोकण में जैन धर्म का उद्धाम’ ‘अगस्ती संप्रदाय’, ‘कोकणातील शिव संप्रदाय’, ‘हिस्टरी ऑफ भंडारी कम्युनिटी’ इत्यादी ग्रंथांचे लेखन. सध्या मुंबईच्या सांस्कृतिक परंपरेवर लेखन.

१९९४ पासून मुंबई चौफेर व आपला वर्ताहरचे संपादन, १९७५ पासून भंडारी समाजाचे मुखपृष्ठ हेटकरी मासिकाचे संपादक, इतिहास संशोधन पत्रिकेचे ५ वर्षे संपादनमुंबई मराठी पत्रकार संघ, साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा व इतर अनेक भंडारी मंडळांचे अध्यक्ष व विश्वस्त. 

Bibliographic information